श्री गुलाब गोन्दुजी मोहोड / पांडुरंगनाथ / ज्ञानेश्वरकन्या
माता – पिता : श्री गोन्दुजी व सौ. अलोकाबाई मोहोड
६ जुलै १८८१, आषाढ शु. १०, अमरावती जवळ लोणीटाकळीत जन्म
चवथ्या महिन्यात अंधत्व / अल्पायुषी : वय चौतीस वर्ष.
वयाची पहिली चार वर्ष माधानला वास्तव्य.
इ. स. १८८५ : मातृवियोग
त्या नंतरची सहा वर्ष आजोळी लोणीटाकळीला वास्तव्य
या काळात दैवी गुणांचा उदय आणि सर्वज्ञतेचा परिचय, लोकांकडून ग्रंथ वाचून घेण्यासाठी आत्यंतिक परिश्रम.
इ. स. १८९६ : विवाह. पत्नी : सौ. मनकर्णिका.
इ. स. १८९७ पासून निबंध व अभंगांची रचना, आनंदमार्ग खंडन. पितृवियोग
इ. स. १९९० बाल सवंगड्याना अनुग्रह सिरसगाव, चांदूरबाजार, यावली इत्यादी ठिकाणी लोकोद्धारासाठी भ्रमंती. घरच्या विषप्रयोगादी कटकटीना कंटाळून आणि पाटीलकी वरून पाणी सोडून गृहत्याग.
इ. स. १९०१ श्री ज्ञानेश्वर माउलींचा साक्षात अनुग्रह.
इ. स. १९०२ ग्वाल्हेर चे स्वानंदसाम्राज्यकर्ते जठारांना पत्र त्यात –
मानभाव, “डार्विन मतसमीक्षा” स्पेन्सर मतसमीक्षा.
स्त्रीगीते : झोपाळा व जात्यावरील लोकगीतांची रचना.
पंढरपूर यात्रा, अमरावतीला आगमन.
हरिभाऊ केवले या शिष्योत्तामाची भेट.
इ. स. १९०३ – कात्यायनी व्रताचा आरंभ देऊरवाडा
इ. स. १९०४ – पुनर्जन्माचे संस्मरण – गुजरातेतील झिंजूवाडा येथील सत्पुरुष स्वामी बेचारानंद (इ. स. १७९५ – १८८०)
आर्वी चे सत्पुरुष दामोदर आपाजी महाराज यांची भेट.
ज्ञानेश्वरीच्या निरुपणास आरंभ.
उपलब्ध प्रतीत नसलेली ज्ञानेश्वरीतील ओवी सांगितली.
माधुर्यामृतसागरास भरती.
विविध विषयांवर निरुपणे.
बालसवंगडी व पहिला शिष्य असलेल्या रामचंद्रबापूंना मृत्यूसमयी पुढील महायात्रेसाठी दिलेल्या सूचना.
आळंदीवारीचा आरंभ.
स्त्रीव्रतांचा आरंभ.
रुक्मिणी स्वयंवराची रचना.
इ. स. १९०५ – महाराजांचा श्रीकृष्णाशी विवाह.
श्रीकृष्णमूर्ती व ज्ञानेश्वरमाउलीच्या पादुकांची नित्यपूजा.
प्रियशिष्य आणि उत्तराधिकारी नारायणराव पंडितांची भेट.
मुलगा – अनंत याचा जन्म.
ल. रा. पांगारकर यांची भेट व लोकनायक बापुजी अणे यांची भेट
इ. स. १९०७ नागपूर येथे ज्ञानेश्वर मुद्रणालयाची स्थापना व ग्रंथछपाईला आरंभ.
मायर्सच्या ग्रंथाची समीक्षा.
वैज्ञानिक जगदीशचंद्र बोसांच्या ग्रंथांची समीक्षा.
कलकत्ता येथे प्रा. प्रीयानाथ मुखर्जी कडे मुक्काम.
जगन्नाथपुरी यात्रा.
योगप्रभाव, चित्तोपदेश व सद्वैजयंती इ. ग्रंथांची रचना.
शिवाच्या नित्य पार्थिवपूजनाचा आरंभ.
प्रियालीलामोहोत्सावादी ग्रंथांची रचना.
इ. स. १९०९ अंतर्विज्ञान संहिता या सूत्र ग्रंथाची रचना व त्यातील ९ सूत्रांवर अलौकिक ९ व्याखाने.
वृन्दावनाची यात्रा.
इ. स. १९१० – डॉ. मुंजेना पत्र.
न्याय वैशेषीकातून भौतिक विज्ञान संबंधी मार्गदर्शन.
पुण्याच्या साहित्यसम्राट न. चि. केळकरांशी भेट.
इ. स. १९११-१३
विविध विषयांवर पत्रे, लेख व अनेक ग्रंथांची निर्मिती.
इ. स. १९१४ – श्री निवृतीनाथांचा दृष्टांत.
देवासच्या श्रीमंत तुकोबराजे पवार यांना पत्रे व देवास भेट.
संगीतकार पं. भातखंडेशी पत्राचार / गानसोपानाची रचना
धुळ्याचे सत्पुरुष बाबा गर्दे यांचाशी भेट.
२० सप्टेंबर १९१५ – भाद्रपद शु. १२ वामनव्दादशी रोजी पुणे मुक्कामी, चाकण ऑइलमिलच्या परिसरातील वास्तूत शेवटच्या क्षणी देखील स्वताच्या अनुभवाचा दाखला देऊन शास्त्र निष्ठेचा नारायण पंडितांना उपदेश केला आणि सूर्योदयाचे समयी ब्रह्मस्थानी प्रस्थान केले.