श्री गुलाबराव महाराज
श्री गुलाबराव महाराजांचा जन्म, अमरावती जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माधान येथे ६ जुलै १८८१ रोजी झाला. वयाच्या नवव्या महिन्यातच त्यांची बाह्यदृष्टी गेली आणि त्यांना संपूर्ण अंधत्व आले. तरी त्यांनी अंतर्दृष्टीने जगातल्या अनेक विषयांमध्ये वेद-वेदांतापासून संगीत, वैद्यक शास्त्र, साहित्यशास्त्र, तत्त्वज्ञान, आधुनिक विज्ञान, थिऑसॉफी, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान अशा चौफेर विषयावर १३४ ग्रंथांची रचना अनेक भाषांमध्ये केली. अवघ्या ३४ वर्षांच्या अल्प आयुष्यात त्यांनी सनातन मानव धर्मासाठी जे कार्य केले ते अजोड आहे.
Read More